loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात १६ ऑक्टोबरला रक्तदान शिबीर यशस्वी; १५ कर्मचारी व विद्यार्थ्यांसह तहसीलदार ढोले यांनी केले रक्तदान

लांजा (संजय साळवी) - शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत व अनुगामी लोकराज्य या अभियानांतर्गत लांजा तहसील कार्यालय व अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा तहसील कार्यालय येथे शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीर पार पडले. या एकूण १५ कार्यालयीन कर्मचारी व कल्पना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात लांजाच्या तहसीलदार प्रियांका ढोले यांनी स्वतः रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाच्या सेवा संकल्प अभियानांर्गत लांजा तहसील कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्यासह पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, आंतरवासिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय डॉ. गायत्री बच्छाव, डॉ. निनाद हारी, अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालय रत्नागिरी जयश्री कुंडलकर, रक्तपेढी तंत्रज्ञ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी जनसंपर्क अधिकारी सृजा पवार सफा होडेकर, रक्तपेढी परिचर जिल्हा रुग्णालय रत्नागिरी धनश्री पानवलकर, कक्ष सेवक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अमित जगताप आदि उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या रक्तदान शिबिरात एकूण १५ कार्यालयीन कर्मचारी व कल्पना कॉलेज लांजाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी या शिबिरात स्वतः रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनुलोम संस्थेचे कोकण विभागप्रमुख रवींद्र भोवड, उपविभागप्रमुख तथा संवादिनी रत्नागिरी - सिंधुदुर्ग तनया शिवलकर, लांजा - राजापूर भाग जनसंपर्क प्रज्योत खानविलकर यांच्यासह प्रशांत कांबळे, चंद्रकांत भुवड, निलेश पांचाळ, कल्पना कॉलेज लांजाचे मंगेश चव्हाण आदिंसह तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg