संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दान पारमिता फाउंडेशन, यांच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील तळा येथील ऐतिहासिक कुडालेणी येथे बुद्ध लेणी, शिल्पकला, अशोक कालीन व सातवाहन कालीन इतिहास आणि धम्मलिपी अभ्यास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी, अभ्यासक आणि धम्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या कार्यशाळेत कुडालेणी येथील बुद्ध लेण्यांचा इतिहास, प्राचीन शिल्पकला, स्थापत्यशैली तसेच लेण्यांच्या प्रवेशद्वारांच्या बाहेरील बाजूस असलेल्या सातवाहनकालीन धम्मलिपीतील शिलालेखांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिलालेखांचे वाचन करून प्राचीन धम्मलिपीचा अभ्यास केला. त्यामुळे इतिहास, भाषा आणि धम्मसंस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली. या विषयी परिपूर्ण मार्गदर्शन दान पारमिता फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक सुनील खरे,संतोष अंभोरे,रूपाली गायकवाड आणि विकास शिंदे यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक रूपाली गायकवाड यांनी केले. आपण या ऐतिहासिक स्थळी कशासाठी एकत्र आलो आहोत, यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी लेणी संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि धम्मपरंपरेचे संरक्षण यांचे महत्त्व विशद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात पुन्हा धम्माचा रथ पुढे आणला आहे. हा धम्माचा रथ पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून घेणे आणि त्याचे जतन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा ऐतिहासिक लेण्यांना केवळ वैयक्तिक भेट न देता आपल्या कुटुंबीयांसह भेट द्यावी, जेणेकरून पुढील पिढीलाही आपल्या समृद्ध इतिहासाची ओळख होईल, असे आवाहन केले. सुनील खरे यांनी बुद्ध लेण्यांचा इतिहास, लेण्यांची निर्मिती, प्राचीन भाषा, शिलालेखांचे महत्त्व आणि त्यांचे वाचन कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती दिली. प्राचीन इतिहास समजून घेण्यासाठी केवळ लेणी पाहणे पुरेसे नसून त्यामागील भाषा, लिपी, शिल्पकला आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विकास शिंदे यांनी सातवाहनकालीन राजे, त्यांचा इतिहास, त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती आणि बौद्ध धम्माच्या प्रसारातील योगदान याविषयी माहिती दिली.आजची तरुण पिढी केवळ आधुनिकतेच्या मागे धावत नसून आपल्या धम्माचा इतिहास, बुद्ध लेणी, प्राचीन शिलालेख आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी जागरूक होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे नमूद करण्यात आले.
या कार्यशाळेस रत्नागिरी, अमरावती, बारामती, नाशिक, मुंबई, सातारा आदी ठिकाणांहून विद्यार्थी व अभ्यासक, धम्मप्रेमी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून पाली भाषा अभ्यासक प्रा.दिलीप वासनिक यांच्या सोबत विजय जाधव, अनामिका जाधव, दिपिका वासनिक, संजय आयरे,सुप्रिया आयरे,सुहास कांबळे,तृप्ती कांबळे, तानाजी कांबळे शुभांगी कांबळे, प्रकाश कांबळे, रजनी कांबळे, अशोक जाधव,अनिल जाधव, नंदादीप जाधव,मनोज गमरे, अतुल कांबळे, आदेश कांबळे आणि मृण्मयी गमरे आदींचा समावेश होता. या कार्यशाळेच्या निमित्ताने प्राचीन बुद्ध लेणी, सातवाहनकालीन धम्मलिपी आणि बौद्ध संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सर्वांना मिळाली. पुस्तकांमधून इतिहास वाचण्याबरोबरच प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तेथील शिलालेखांचे वाचन करणे, त्यांचा अर्थ समजून घेणे आणि त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण करणे, हा या कार्यशाळेचा महत्त्वपूर्ण उद्देश होता.ऐतिहासिक लेणी ही केवळ दगडात कोरलेली वास्तू नसून ती आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाची, कलात्मक कौशल्याची, धम्मनिष्ठेची आणि सांस्कृतिक समृद्धीची जिवंत साक्ष आहेत. हा वारसा समजून घेणे, जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण कार्यशाळांमुळे नव्या पिढीमध्ये बौद्ध इतिहास, पाली भाषा, धम्मलिपी आणि लेणी संवर्धनाविषयी निश्चितच आवड व जागरूकता निर्माण होईल.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.