loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या डॉ. निवास देसाई यांचा जागतिक गौरव

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. निवास देसाई यांनी मोरींडा ही औषधी वनस्पती आणि तिचे रासायनिक गुणधर्म या संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 'स्कॉलर्स इंडेक्स'च्या 'टॉप 1000 स्कॉलर 2026' या मानांकनात आजपर्यंत केलेल्या संशोधनाच्या आधारे डॉ. देसाई यांनी जगातील अव्वल 1000 संशोधकांमध्ये 564 वा क्रमांक मिळविला असून भारतातील संशोधकांमध्ये त्यांना 73 वे स्थान मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. देसाई हे दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नॅनो पार्टिकल्स, सप्लीमेंट्री फुड्स, फयटोकेमिकल्स, प्लांट मेटबोलाईट मध्ये त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 'कांदळवनातील फळांचा शाश्वत वापर' या विषयावर अत्याधुनिक संशोधन केले जात आहे. मानांकनानुसार त्यांचा इम्पॅक्ट स्कोर 71% असून ते जगातील अव्वल 17% संशोधकांमध्ये आहेत त्यांचा डी इंडेक्स 3 आणि एच इंडेक्स 12 आहे.

टाईम्स स्पेशल

डॉक्टर देसाई यांना मिळालेले हे मानांकन दापोली सारख्या ग्रामीण भागातील कॉलेजमधे संशोधनाची वाढती जागतिक व्याप्ती अधोरेखित करणारे ठरले आहे. या मानांकनाबद्दल डॉक्टर देसाई यांनी दापोली एज्युकेशन सोसायटी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, आणि निधी पुरवणाऱ्या संस्थांचे आभार मानले आहेत. तसेच संशोधन आणि वैज्ञानिक नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारे दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, माजी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांच्या सहकार्याबद्दल डॉ. देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg