loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्याबाबत मनसेच्या वतीने गुहागर तहसीलदार यांना निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी गुहागर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,गुहागर तालुक्यात यंदाच्या हंगामात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांमध्ये शेतीच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी शेतजमिनीतील ओलावा कमी झाला असून भात, भाजीपाला तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून, पिकांच्या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन गुहागर तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची परिस्थिती व प्रत्यक्ष शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे व सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच शासनाच्या निकषांनुसार गुहागर तालुका 'दुष्काळग्रस्त / दुष्काळसदृश तालुका म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी व पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीक नुकसान मदत तसेच शासनाच्या उपलब्ध दुष्काळ निवारण योजनांचा लाभ देण्यात यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका शेतकयांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करीत आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

टाईम्स स्पेशल

गुहागर तालुक्यातील पावसाची व पिकांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करावी. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी.शासनाच्या निकषांनुसार गुहागर तालुका दुष्काळग्रस्त / दुष्काळसदृशं जाहीर करण्याची कार्यवाही करावी. पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निवारणाच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यावा. पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिका-यांकडे सादर करावा. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, ही अपेक्षा मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुका अध्यक्ष प्रसाद विखारे, गुहागर शहर अध्यक्ष अभिजित रायकर सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण, माजी शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg