loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये घरफोडी; 1 लाख ४२ हजारांचा ऐवज चोरीला, शिवबुद्रुक मोहल्ल्यातील घराला चोरट्यांचा लक्ष्य

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील शिवबुद्रुक मोहल्ला येथे २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४० वाजण्यापूर्वी घरफोडीची आणखी एक घटना घडली. तक्रारदार अहमद महमद परकर (वय ५६, व्यवसाय शेती, रा. शिवबुद्रुक मोहल्ला, ता. खेड) यांच्या घरातील मुख्य दरवाजाचे लॉक व कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याच्या दोन चेन, सोन्याच्या अंगठ्या, कानातील फुले, रोख रक्कम, गॅस सिलिंडर, इन्व्हर्टरच्या तीन बॅटऱ्या तसेच अल्युमिनियम व तांब्याच्या भांड्यांचा समावेश आहे. या चोरीची एकूण किंमत १ लाख ४२ हजार २५० रुपये असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. दोन्ही घरफोड्यांमुळे खेड परिसरात घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg