loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेखोल गावात बेकायदेशीररित्या तोडण्यात आलेल्या लाखो रुपये किंमतीचे सागवान, फणस, आंबा इतर झाडे वनविभागाकडून जप्त, परिसरात खळबळ

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील काही गावात वृक्षतोडीला बंदी आहे. सरसकट वृक्षतोडीला बंदी घातली आहे. ही बंदी उठवली नसली तरी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात मोठया प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तळेखोल गावात गडगिलवाडी या ठिकाणी खाजगी मालकी ठिकाणी भली मोठी झाडे बेकायदा तोडली जात आहेत याची किंमत लाखोच्या घरात आहे. अशी तक्रार काही जणांनी थेट दोडामार्ग वन विभाग कार्यालय केली. या नंतर दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या टीमने तळेखोल गावात दाखल होऊन तोडलेली लाखो रुपये किमंतीचे झाडे पंचनामा करून ताब्यात घेतली. यामुळे बेकायदेशीर झाडे तोडणार्‍यांना चांगला दणका बसला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तळेखोल गडगंज या ठिकाणी लोकवस्ती जवळ असलेल्या जंगलात खाजगी जागेत मोठया प्रमाणात जंगली सागवान तसेच भले मोठे फणस, आंबा झाडे इतर जंगली झाडे तोडण्यात आली. याबाबत वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नाही. दोन तीन गाडया भरुन मोठे लाकुड तर दोन गाडया जळाऊ लाकुड होते. लाखो रुपये किमंतीचे सागवान, फणस, आंबा, इतर झाडे, सोमवारी वाहनात भरून ती नेली जाणार याची भनक गावातील काही वृक्षप्रेमींना लागली आणि चक्रे फिरली. काही जणांनी बेकायदेशीर झाडे तोडून टाकली याची तक्रार दोडामार्ग वन विभाग कार्यालयात केली आणि वन विभाग खडबडून जागे झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg