loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली एसटी स्टँडमध्ये येण्यासाठीच्या वाहतुकीत बदल; एस.टी. स्टँडचा मुख्य प्रवेशद्वार बंद, मागील भागातून वळवली बस वाहतूक

दापोली (प्रतिनिधी) : दापोली एस.टी. स्टँड समोरील दापोली-खेड मार्गाच्या रस्ता सुधारणेचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आल्याने सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकिवर परिणाम होवून वाहतुकिला अडसर निर्माण होवू नये, यासाठी दापोली एसटी स्टँडमध्ये येण्यासाठीच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दापोली-खेड मार्ग सुधारणा कामामुळे एस .टी. स्टँडचा मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आला असून वाहतुक एस. टी. बसेसची वाहतूक मागील भागाकडून वळवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली ते खेड दरम्यानच्या रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे, सुरक्षेचा उपाय म्हणून दापोली एसटी स्टँडचे पुढील मार्गावरील मुख्य गेट (प्रवेशद्वार) बंद करण्यात आले आहे. यास पर्यायी मार्ग म्हणून एस.टी. बसेसची वाहतूक दापोली एस.टी.स्टँडच्या मागील बाजूकडून वळवण्यात आली आहे. येथूनच लांब तसेच जवळ पल्ल्याच्या एस.टी. बसेसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या बदलाची सर्व प्रवाशांनी तसेच खाजगी वाहनचालकांनी नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन दापोली एस.टी. आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg