loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावर यू-टर्न घेणे बेतले जीवावर; स्कोडा कारच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगलट (इक्बाल जमादार) - मुंबई–गोवा महामार्गावरील वहूर गावच्या हद्दीत मध्य दुभाजकातून यू-टर्न घेणाऱ्या दुचाकीस्वाराला स्कोडा कारने धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वहूर गावच्या हद्दीत मध्य दुभाजकातून यू-टर्न घेणाऱ्या मोटारसायकलस्वाराला भरधाव स्कोडा कारने जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अक्षय सदानंद खेडेकर (वय २३, रा. चोचिंदे, ता. महाड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अक्षय खेडेकर हा आपल्या ताब्यातील यामाहा मोटारसायकलवरून (क्र. एम.एच. ०६ / सी.एच. ०५२७) गोव्याच्या दिशेने जात होता. वहूर गावच्या हद्दीत आल्यानंतर त्याने महामार्गाच्या मध्य दुभाजकाला असलेल्या कटमधून यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कोडा कारने (क्र. एम.एच. ०५ / ८२६४) त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. मयूर दिलीप पंडित (वय ३०) हे ही कार चालवत होते. या भीषण धडकेत दुचाकीस्वार अक्षय खेडेकर याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

टाईम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, हेडकॉन्स्टेबल मोरे आणि हेडकॉन्स्टेबल गोविलकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg