loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यात उदंड प्रतिसाद, १ लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांची नोंदणी; १२ हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वाटप

रत्नागिरी, : शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'महिला शेतकरी सक्षमीकरण अभियाना'ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल १ लाख १२५ महिला शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात अभियानांतर्गत एकूण १९६ ग्रामसभा यशस्वीरीत्या पार पडल्या असून, आतापर्यंत पात्र व सहभागी महिलांना १२ हजार १३२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यातील सर्व पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service) महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा आणि या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. राज्यभरात या अभियानाला अभूतपूर्व यश मिळत असून, संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ६२ लाख ७७ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभरात ९ हजार ६६५ ग्रामसभा घेण्यात आल्या असून, पात्र महिलांना ९ लाख ९७ हजार ३५७ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदणी : रत्नागिरी : १८,८९१, चिपळूण : १८,४४७, गुहागर : ११,३६७, खेड : ११,२६३, राजापूर : ९,१७३, संगमेश्वर : ९,०७६, दापोली : ८,९४६, लांजा : ८,३३०, मंडणगड : ४,६२७ अभियानाचे प्रमुख फायदे : शासकीय कृषी योजना, आधुनिक कृषी अवजारे आणि विविध अनुदानांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. शेती व्यवसायातील महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधिकृत ओळख मिळून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी. आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेती तसेच कृषी पूरक व्यवसायांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण. अभियानांतर्गत नोंदणीकृत सर्व पात्र महिला शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg