loader
Breaking News
Breaking News
Foto

एकात्मता वारकरी संप्रदायाच्या कोकण दिंडीचे बापार्डेतून प्रस्थान

वैभववाडी (प्रतिनिधी) - एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी सोहळा देवगड बापार्डे (काळेश्वरवाडी) येथून बुधवार दि. 11/11/2026 रोजी सकाळी 6 वाजता संस्थापक ह.भ.प. रामचंद्र बाबाजी लाड महाराज यांच्या शुभहस्ते प्रस्थान झाले. गुरुवार दि. 12/11/2026 रोजी दुपारी 2 वाजता संभाजी चौक, वैभववाडी बाजारपेठ येथे रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी माऊलीचा अश्व हा उमेश दळवी (तंटामुक्त अध्यक्ष, उबर्डे) यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन दिवस पायी चालून दमलेल्या वारकरी माऊलींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजन राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, वैभववाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. विश्वनाथ गवंडलकर (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय), कार्याध्यक्ष संतोष राऊळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या संतोष धोंडू बोडके यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले. तसेच रिंगण सोहळासाठी वैभववाडी तालुक्यातील वारकरी माऊली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg