loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत आरवली ग्रामपंचायतीचा पुढाकार; ओढ्यावर साखळी बंधारे

(संगमेश्वर) - मकरंद सुर्वे संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील बौद्धवाडीत आरवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून ओढ्यावर साखळी विजय बंधारे उभारण्यात आले. ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाला चालना मिळणार असून, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भविष्यात करता यावा, या उद्देशाने साखळी पद्धतीने विजय बंधारे उभारण्यात आले. पाण्याची उपलब्धता वाढविणे, भूजल पातळीत सुधारणा करणे तसेच उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा बंधाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास गावातील पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. या वेळी गौतम कदम, सागर कदम, उत्तम कदम, राहुल कदम, दिलीप कदम, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन कदम आणि माजी सरपंच निलेश भुवड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ‘मिशन बंधारे’ उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचा प्रयत्न केला जात असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg