देवगड (प्रतिनिधी) - मासळी वाहतूक करणार्या वाहनांमधून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडणार्या तसेच विनापरवाना वाहन चालविणार्या वाहन चालकांवर वाहतूक नियमांनुसार देवगड पोलिसांनी गुरुवारी दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेत सहा वाहनधारकांवर एकूण ९ हजार ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी केली. या धडक कारवाईबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
देवगड-विठ्ठलवाडी परिसरातून दररोज मासे वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. मासे ताजे राहण्यासाठी या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा वापर केला जातो. मात्र, बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याची तक्रार तेथील स्थानिक ग्रामस्थांनी देवगड तहसीलदार, देवगड पोलीस निरीक्षक व मत्स्य व्यवसाय विभागाकडे केली होती. सदर पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यापूर्वीही अशा अपघातांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देवगड तालुका पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा असताना रस्त्यावर असे दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्याने परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मासे वाहतूक करणार्या वाहनचालकांनी योग्य खबरदारी घेऊन रस्त्यावर पाणी सोडणे तातडीने बंद करावे. संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाईदेखील करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.
दरम्यान, सदर मागणीच्या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनीही मासळी वाहतुकीबाबत संबंधित वाहनधारकांना मार्गदर्शक सूचना जारी करून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास कारवाईचे संकेत दिले होते. याबाबत देवगड पोलिसांनी गुरुवारी विशेष मोहीम राबवित वाहतुकीच्या विविध नियमांनुसार मासळी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण सहा वाहनधारकांवर सुमारे ९ हजार ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाप्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे देवगड पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.