loader
Breaking News
Breaking News
Foto

महसूल सेवक पदभरतीसाठी मालवण तहसील कार्यालयात उद्या सोडत

मालवण (प्रतिनिधी) - महसूल विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या महसूलसेवक (कोतवाल) पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या पदांसाठी सजानिहाय सामाजिक प्रवर्ग व महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण तहसीलदार कार्यालय येथे सोडत काढण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या 'महसूल सेवक" (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून महसूल सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. तहसीलदार मालवण यांच्या आस्थापनेवरील महसूल सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्यापूर्वी सोडत पद्धतीने संजानिहाय सामाजिक प्रवर्ग आरक्षण व महिला आरक्षण निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही सोडत आयोजित करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

या सोडतीमध्ये देवबाग, हडी, हिवाळे, पेंडूर आणि कट्टा या सजांचा समावेश आहे. इच्छुकांनी गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तहसीलदार कार्यालय, मालवण येथे उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg