loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेस पक्षात मोठ्या नेत्यांचे लवकरच प्रवेश,तसेच आरक्षणबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे विधान

पुणे: राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडतं. सध्या राज्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असं विधान केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे या सर्व चर्चा झडत असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भविष्यकाळात काँग्रेसमध्ये अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असा दावा त्यांनी केल्याने आगामी काळात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतो, हा गट मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकालाही पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जातोय. यावर बोलताना, देशात 50 टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणलं. 2029 सालापासून महिला आरक्षण विधेयक लागू करा ही काँग्रेसची मागणी आहे. मात्र आरक्षणाच्या नावाखाली डिलीमीटेशन बिल आणण्याचा भाजपचा डाव आहे. इंडिया आघाडीतील सगळे पक्ष याला विरोध करणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच भाजपची पाठराखण करतांना मित्रपक्षांनी विचार करावा, असा सल्लाही सपकाळ यांनी मित्रपक्षांना दिला. आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे सुप्रिया सुळेंनी याआधी सांगितलेलं आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ सावर्जुन म्हणाले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एक मोठा नेता काँग्रेस पक्षामध्ये येणार असल्याच्या चर्चेला हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुणे भेटीनंतर वेग आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षातील आमदारांनी पक्ष वाढीसाठी भविष्यात काँग्रेस पक्षात इतर पक्षातील नेत्यांना घेण्याची व्यूह रचना आपल्याचे बोलले जाते. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg