खेड - युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संघटनेची सामाजिक वाटचाल अधिक बळकट करण्यासाठी अरविंद रामचंद्र महाडिक यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी, विलास बाळकृष्ण कळमकर रत्नागिरी सचिव तर रमेश सहदेव चव्हाण यांची दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी, वहिद दाऊद कडवेकर दापोली विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्त्यांमुळे दापोली तालुक्यातील जनहिताचे प्रश्न, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, कामगारांचे हक्क आणि पर्यावरण संरक्षणाच्या विषयांवर संघटितपणे काम करण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. दापोली तालुक्यात चर्चेत असलेल्या पुढील तीन प्रस्तावित प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती, मागण्या आणि चिंता शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्न करणार आहे. १. भिवबंदर—आघारी परिसरातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प. २. चिखलगाव (पश्चिम) येथील प्रस्तावित बॉक्साईट खाण प्रकल्प. ३. प्रस्तावित नवनगर/विकास प्रकल्प.
या प्रकल्पांमुळे शेती-बागायती, पाणी, समुद्र, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण, पर्यटन, स्थानिक रोजगार आणि भावी पिढीच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणे, ग्रामस्थांशी संवाद साधणे आणि संबंधित यंत्रणांकडे निवेदने सादर करणे यासाठी जिल्हाध्यक्ष अरविंद रामचंद्र महाडिक, जिल्हा सचिव विलास बाळकृष्ण कळमकर, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश सहदेव चव्हाण, दापोली विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख वहिद दाऊद कडवेकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. या विषयांवरील पुढील भूमिका, कार्यक्रम आणि स्थानिक पातळीवरील कार्यवाही नवनियुक्त पदाधिकारी नागरिकांशी चर्चा करून ठरवतील. संघटना त्यांच्या कायदेशीर, लोकशाही मार्गाने होणार्या जनहिताच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करेल. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच कंत्राटी, मानधन, तात्पुरत्या आणि आउटसोर्सिंग पद्धतीने काम करणार्या कर्मचारी-कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेने सुरू केलेला संघर्ष अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संघटनेच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी नवनियुक्त रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरविंद महाडिक, रत्नागिरी जिल्हा सचिव विलास कळमकर आणि दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश चव्हाण, दापोली विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख वहीत कडवेकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील जनहिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, सल्लागार महाराष्ट्र राज्य अनिल तांबे, वकील संदेश मोरे, महाराष्ट्र कार्यालय सचिव रामचंद्र कदम, महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा माने, साजिदभाई काजी तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव, खेड तालुका महिला अध्यक्ष वर्षा म्हसकर, खेड तालुका उपाध्यक्ष विजय जाधव, खेड तालुका प्रवक्ते अनिल सदरे, युवा तालुकाध्यक्ष सचिन खेडेकर, सदस्य फारूक मणियार, सदस्य वारीस तांबे, ज्येष्ठ अनिल खोत, सीमा शिंदे, जाधव, रूपेश खेडेकर व युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे सदस्य उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.