loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. संदेश चिकणे यांची वकिली व्यवसायात २५ वर्षांची यशस्वी वाटचाल

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील प्रसिद्ध व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. संदेश चिकणे यांनी वकिली व्यवसायात तब्बल २५ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी विशेष भेट घेण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ आण्णा कदम यांनी ऍड. संदेश चिकणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या वकिली क्षेत्रातील २५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय वाटचालीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यातही त्यांच्या हातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे आणि त्यांच्या व्यावसायिक जीवनाची पुढील वाटचाल यशस्वी, समाधानकारक व प्रेरणादायी व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या २५ वर्षांपासून न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात कार्यरत राहून कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ऍड. संदेश चिकणे यांनी केले आहे. सतीश उर्फ पप्पू चिकणे (उपनगराध्यक्ष तथा पाणी सभापती, खेड न.प.), रामभाऊ भुवड, राजेंद्र शेलार, कौशल चिखले, किरण डफळे, विशाल सागवेकर, संदेश शिगवण, कृष्णा वनारसे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg