loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरात खळबळ; रत्नागिरीतील व्यापार्‍याचे अपहरण कुणी केले?

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी शहरातील एका प्रसिद्ध व्यापार्‍याचे अपहरण झाल्याचे कळताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक स्वरुपात त्यांचे अपहरण झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे. पोलिसांनीही त्यादृष्टीने माहिती देताना सांगितले. रत्नागिरी शहरातील व्यापारी सज्जन उर्फ पापा ओसवाल (सज्जन अमरचंद ओसवाल) यांच्या बेपत्ता होण्याबाबातची तक्रार रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. ओसवाल यांचे अपहरण कोणी, का केलेे? याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रत्नागिरीमधून ते कोल्हापूरला गेले असे म्हटले जात आहे. पण ते कोल्हापूरला का गेले याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. चारही बाजूंनी त्यांचा शोध घेण्याचे सुरु आहे. नातेवाईक आणि ओळखिचे मित्र त्यांचा शोध घेत आहेत. सज्जन ओसवाल हे ५४ वर्षांचे असून रत्नागिरीतील रहिवाशी आहेत. त्यांची उंची ५.५ इतकी आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर त्यांचे शेवटचे दिसून आले. जर कोणाला काही माहिती मिळाली असेल तर ९१६८१४२८०० किंवा ९७६३१३४७२५ येथे संपर्क करावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg