loader
Breaking News
Breaking News
Foto

साडवली सह्याद्रीनगर मित्र मंडळ आयोजित पाककला स्पर्धेचे संगीता जाधव यांच्याहस्ते उद्घाटन

देवरुख : साडवली सह्याद्रीनगर मित्र मंडळ आयोजित व संगीता सुखदेव जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या पाककला स्पर्धेचे उद्घाटन संगीता जाधव यांनी फित कापून व प्रो कबड्डी कोच प्रशांत सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून महीलांच्या पाककलेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच महीलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा उद्देश होता. या स्पर्धेचे नियोजन, नेहा आखाडे, सोनाली नलावडे, प्राची चव्हाण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळीप्रमुख उपस्थितीत प्रो कबड्डी खेळाडू सतिश खांबे, पप्पू नाखरेकर, प्रमोद सुर्वे, मोहन कनावजे, विनोद वाडकर, जितेंद्र नलावडे, अभिजित पाटील, अनिकेत सुर्वे व मंडळातील सर्व कार्यकर्ते, साक्षी नाखरेकर, मनिषा पाटोळे, रतन भोपळकर, रोहीणी सावंत, मनाली कनावजे, माधुरी धामणे, सारीका भिंगार्डे, सुजाता घडशी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

परीक्षक म्हणून शरदचंद्रजी पवार कृषी अन्न तंत्रज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक चोरगे, सरगर यांनी परीक्षण केले. यामध्ये प्रथम क्रमांक-संगीता पवार, द्वितीय क्रमांक-श्रद्धा गुरव, तृतीय क्रमांक-सच्चिदा राणे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेत मूग हा घटक वापरण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg