loader
Breaking News
Breaking News
Foto

सीबीएसईतर्फे मानसिक आरोग्यावर शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मानेज इंटरनॅशनल स्कूल आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य आणि कल्याण या विषयावर एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉक्टर स्नेहल अतुल निकुंभ व किरण दरेकर, मानेज इंटरनॅशनल च्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या हस्ते छोटे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ डॉ. स्नेहल निकुंभ आणि किरण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. ताणतणाव म्हणजे काय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर होणारा परिणाम, चांगले मानसिक आरोग्य जीवन समृद्ध कसे करते?, उत्तम आरोग्य असलेला विद्यार्थी कसा ओळखावा?, मानसिक आरोग्याच्या विविध समस्या आणि विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या सामान्य भावनिक अडचणी, पौगंडावस्थेतील मुलांसमोरील आव्हाने तसेच शिक्षकाने विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते कसे जोडावे आणि त्यांना आधार कसा द्यावा? या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमधील भावनिक बदल ओळखून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे आणि वर्गात सकारात्मक वातावरण तयार करणे याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यशाळेला परिसरातील विविध शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मजगावकर यांनी केले. शिक्षिका मुनाझ्झा दर्वे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg