loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नावाने बनावट व्हाट्सअ‍ॅप मेसेज; सावधान..!

रत्नागिरी, : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो वापरून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअ‍ॅपद्वारे पैसे पाठवण्याची मागणी करणारे बनावट संदेश पाठवले जात आहेत. हा संदेश अथवा संबंधित मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी यांचा नसून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारे या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, ७५४१०८०७०० या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो लावून व्हाट्सअ‍ॅपवर पैसे पाठवण्याबाबत संदेश पाठवण्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार पूर्णपणे बनावट असून, अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी व संबंधितांनी ७५४१०८०७०० या क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही व्हाट्सअ‍ॅप मेसेजला प्रतिसाद न देता सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg