loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी ते विजघर रस्ता कामास सुरुवात करण्यासाठी हालचाली सुरू, तहसीलदारांनी पाहणी करून ठेकेदाराला दिल्या सूचना

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर रस्ता दरम्यान दोडामार्ग ते तिलारी काम सुरू झाले पण पुढे तिलारी ते विजघर रस्ता कामाला सुरुवात केली नाही. यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. या नंतर १६ नोव्हेंबर रोजी कामाला सुरुवात करतो, असे सांगितले पण कामाला सुरुवात झाली नाही. याकडे आंदोलनकर्त्यांनी दोडामार्ग तहसीलदार, पोलीस निरीक्षक, यांचे लक्ष वेधले. या मंगळवारी संबंधित ठेकेदाराकडून मशिनरी पाठवून रस्ता कामाला सुरुवात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी पाहणी करून ठेकेदाराला समज दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी तिलारी मेढे विजघर रस्ता अपूर्ण कामाची पाहणी केली. यावेळी सरपंच सेवा संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस, संतोष मोरये, मनोहर गवस, संदेश वरक, इतर उपस्थित होते. तातडीने कामगार, मशिनरी आणून जलदगतीने कामाला सुरुवात करा, अशा सूचना दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg