loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ मराठी ॲपचे लोकार्पण

मालवण (प्रतिनिधी) - श्री क्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. ‘सनातन पंचांग’ ॲप खूप चांगले वं सुंदर पंचाग असून अतिशय उपयुक्त आहे. अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन यावेळी स्वामी नरेंद्राचार्य यांनी केले. यावेळी स्वामी नरेंद्राचार्य यांनी ‘सनातन पंचांग’ सात भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे आवर्जून सांगत त्यांनी स्वतःच्या भ्रमणभाषवर ॲप डाऊनलोड करून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी स्‍वामीजींच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण झाल्याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने गोविंद भारद्वाज, दीपा औंधकर, शुभांगी मुळ्ये आणि हनुमंत करंबेळकर हे उपस्थित होते. ‘सनातन पंचांग’ हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. Android प्रणालीवरील ‘सनातन पंचांग’ ॲप ४१ लाखांहून अधिक, तर iOS प्रणालीवरील ॲप ७ लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. सर्वांनी हे ॲप डाउनलोड करून भारतीय संस्कृतीचा प्रसार करावा, असे आवाहन ‘सनातन पंचांग’च्या वतीने करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

‘सनातन पंचांग ॲप’ मधून शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्य विषयक टिप्स, सुविचार आदी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक माहिती देण्यात येते. संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना, दिनविशेष, होमस्क्रीन विजेट, रिमाइंडर अशा अनेक सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg