loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; भाजप महिला मोर्चाचे काँग्रेसविरोधात आंदोलन, पनवेलमध्ये जोरदार घोषणाबाजी

पनवेल : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणी सोमवारी काँग्रेसविरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने पनवेल शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपच्या तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालय जवळ जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी काँग्रेस खासदार डॉ. विमोल अकोइजम यांच्यावरील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आणि त्यासंदर्भातील कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित खासदारावर कारवाईची मागणी करत या गंभीर प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व मौन का बाळगून आहे, असा संतप्त सवाल महिला मोर्चाकडून विचारण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनामध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीस माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका रुचिता लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, दमयंती भोईर, प्रियांका कांडपिले, सरस्वती काथारा, राजश्री वावेकर, प्रीती जॉर्ज, श्वेता बहिरा, शिवानी घरत, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, दिक्षा जाधव, राणी म्हात्रे, शिल्पा म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मोर्चाच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg