loader
Breaking News
Breaking News
Foto

एकनाथ शिंदेंचे नवे वकिल मेहता यांनी ठाकरेंचा दावाच निकाली काढला, आता दिवाळीनंतर पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली - शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात ध्रुव मेहता यांचा पहिलाच युक्तिवाद होता. त्यांनी ठाकरे गटाचा महत्वाचा दावा खोडून काढला. विधानसभा मुदत संपल्यामुळे आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी निष्फळ ठरते, असा युक्तीवाद मेहता यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेहता यांच्या युक्तीवादाने न्यायालयासमोर महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश सूर्यकांत यांच्यासमोर सुरु असलेल्या या खटल्यात ध्रुव मेहता यांनी महत्वाचे मुद्दे आणखी मांडले. २१ जून २०२२ रोजी आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून भूमिका कायम होती. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिंदेगटाचा व्हीप वैध होता, असे म्हणणे मेहता यांनी न्यायालयासमोर मांडले. १० व्या अनुसुचीअंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्षांच्या निर्णयात त्रुटी असल्यास सामान्यतः प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठविणे योग्य ठरते. विधानसभा मुदत संपल्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी निष्फळ आहे, असे सांगताना मेहता यांनी राजेंद्रसिंह राणा आणि सुभाष देसाई प्रकरणातील न्यायालयीन निकालांचा दाखला दिला. विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत निर्णय हा चिन्ह निर्णयाशी निगडीत आहे. ते विधानसभा अध्यक्षांचे घटनात्मक अधिकार आहेत. तसेच सुभाष देसाई केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टाइम्स स्पेशल

विधानसभा अध्यक्षांना केवळ विद्यमान सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेता येतो. कीहोतो होलोहोन प्रकरणाच्या निवाड्यानुसार विधानसभा अध्यक्ष हे १०व्या अनुसुचीअंतर्गत न्यायाधिकरण म्हणून काम करतात. त्यांच्या निर्णयांची न्यायालयीन समिक्षा मर्यादित निकषांवरच होवू शकते, असा युक्तीवाद मेहता यांनी केला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायदेशीररित्या चुकीचा ठरल्यास प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणे, हे सामान्यतः योग्य आहे, असेही मेहता यांनी म्हटले. आजची सुनावणी संपली असून आता दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg