रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त रोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात असून देवी तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरण्यासाठी दिवसभर भगिनींची रीघ लागलेली असते.रिवाजानुसार श्री देवी तुळजाभवानीची प्रात:काळी षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी व भगिनींना स्वहस्ते ओटी भरण्यासाठी खुले करण्यात आले.आज श्री. राकेश चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. राधिका चव्हाण या दाम्पत्याने यजमानपद भूषविले. सकाळी ‘श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ’ यांचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. त्यानंतर दुपारी मातोश्री कमलाबाई विसपुते या कुवारबांव येथील इंग्रजी माध्यम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘कन्यामेळा’चा कार्यक्रम अत्यंत बहारदारपणे सादर केला. त्यांना श्रीमती नंदा शेलार, प्रियंका जेठे, मैथिली कोरगांवकर, सोनाली कदम, तन्वी लिंगायत, सान्वी सांडीम, सारिका देवळेकर या शिक्षिकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘कन्यामेळा’ कार्यक्रम अप्रतिमरित्या सादर केला. मीराची भूमिका करणारी कु. अरुणा अमित दुधाणे हिचा अभिनय अतिशय उत्कृष्ट होता. उपस्थितांनी तिचे कौतुक केले. शाळेचे शिक्षक डॉ. अशोक आखाडे, श्रीमती वीणा काजरेकर, श्री. समीर पेडणेकर, सौ. तेजस्विनी यादव, श्री. रोहित भारदे, सौ. प्रियंका हेगिष्टे, श्री. अक्षय नवरे यांनी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.रवि. दि. 18 ऑक्टो. 2026 रोजी प्रात:काळी देवीची पूजा झाल्यानंतर 1) श्री लक्ष्मीकांत महिला भजन मंडळ, भाट्ये (गायिका-सौ. सुषमा भाटकर व कीर) व 2) श्री एकमुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळ, घुडेवठार (गायिका-सौ. प्रेरणा विलणकर) यांची सुश्राव्य भजने देवीच्या दरबारात सादर करण्यात येतील. त्यानंतर सायं. 5 ते 7 या वेळेत सखी भगिनी मंडळ (सादरकर्ते-सौ. माया तांबे आणि मंडळी) यांचा लोकसंगीत कार्यक्रम संपन्न होईल. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिरात विजयादशमीच्या दिवशी मंगळ. दि. 20 ऑक्टो. 2026 रोजी सायं. ठिक 4 वा. ‘राजेशाही दसरा’ हा भारदस्त सोहळा संपन्न होईल. या राजेशाही दसरा सोहळ्याचे यजमानपद 11 दाम्पत्य भूषवतील. सर्व यजमान दाम्पत्यांच्या हस्ते शस्त्र पूजन, शमी पूजन, अश्व पूजन व आपटा पूजन वेदोक्त मंत्रोपचारात संपन्न होईल. त्यानंतर सर्व उपस्थित भाविक सोने लुटतील. यावेळी उपस्थितांना पायनापल शिर्याचा अल्पोपहार देण्यात येईल, असे श्री. नित्यानंद दळवी व श्री. संदीप डोंगरे यांनी सांगितले.या तुळजाभवानी देवस्थानात स्वहस्ते ओटी भरण्यासाठी येणार्या भगिनींना ओटीचे साहित्य सुलभरित्या मिळावे याकरिता देवस्थानतर्फे रु. 30/- इतक्या नाममात्र सवलतीचे दरात ओटीची व पुजेची तबके देवस्थानात उपलब्ध असतील. त्यामुळे भगिनी वर्गाची फार मोठी सोय होते. भगिनींच्या व भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे ही सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरीतील या तुळजाभवानी देवस्थानमध्ये दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी येणार्या सर्व भगिनींना व भाविकांना तुळजाभवानीचा पारंपारिक प्रसाद म्हणजे सुक्या मेव्याचा प्रसाद देण्यात येतो. देवी तुळजाभवानी देवस्थान हे राजेशाही देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळे या देवस्थानमध्ये भाविकांना देण्यात येणारा प्रसाद हा सुक्या मेव्याचा असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजे घटस्थापना सोम. दि. 22 सप्टें. पासून दसरा गुरु. दि. 2 ऑक्टो.पर्यंत रत्नागिरी येथील या तुळजाभवानी देवस्थानमध्ये सर्व भगिनींना देवीची ओटी स्वहस्ते भरण्याची संधी देण्यात येते. भगिनी आपल्या हाताने देवीची पूजा करुन स्वहस्ते ओटी भरु शकतात. नवरात्रोत्सवाच्या काळात हे तुळजाभवानी देवस्थान स. 8.00 पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी खुले असते.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.