loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा उड्डाणपूलानजीक डंपर अडविल्याच्या कारणावरुन ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने पहाटे ३ वाजता मारहाण, घटनेने खळबळ

बांदा (प्रतिनिधी) - बांदा एसटी स्टँडजवळील उड्डाणपुलानजीक डंपर अडविल्याच्या कारणावरून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यावेळी लोखंडी पाईपने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना रविवार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अनिकेत बांदिवडेकर (वय २६, रा. निरवडे, ता. सावंतवाडी) व त्याच्या पाच मित्रांविरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश अनंत दळवी (वय ३७, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. एमआयडीसी कुडाळ, ता. कुडाळ) यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बांदा एसटी स्टँडजवळील उड्डाणपुलानजीक डंपर अडविल्याच्या कारणावरून आरोपी अनिकेत बांदिवडेकर व त्याच्या पाच मित्रांनी फिर्यादी उमेश दळवी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने लोखंडी पाईपने दळवी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस वार करून दुखापत केली. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg