loader
Breaking News
Breaking News
Foto

माणुसकीचे दर्शन! खेडमध्ये हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; नगरसेवकांचे कौतुकास्पद पाऊल

खेड(प्रतिनिधी): प्रामाणिकपणा, विश्वास आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती देणारा कौतुकास्पद प्रसंग खेड शहरात घडला आहे. खेड शहरातील तीन बत्ती नाका येथे पैशांचे पाकीट सापडले होते. सदर पाकीट सुसेरी नं. १ येथील सचिन पाटील यांचे असल्याचे समोर आले. पाकिटामध्ये असलेल्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची ओळख पटविण्यात आली आणि त्यांचे हरवलेले पाकीट त्यांना परत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा संपूर्ण प्रसंग केवळ हरवलेली वस्तू परत मिळण्यापुरता मर्यादित नसून, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे. यावेळी खेड नगरपरिषदेचे नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर मिनार चिखले, नगरसेवक यश खेडेकर, नगरसेविका आरती खेडेकर तसेच नगरसेविका स्वप्नाली चव्हाण यांच्या उपस्थितीत ओळख पटवून सदर पाकीट सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थाच्या काळात एखाद्याला सापडलेली मौल्यवान वस्तू तिच्या खर्‍या मालकापर्यंत पोहोचविणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. पैसा महत्त्वाचा असतो; पण पैशांपेक्षा मोठी असते ती माणुसकी!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg