loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरिवली-आडिवाडीत जय साई सातमाईचा गजर! शारदीय नवरात्रोत्सवाला दणक्यात सुरुवात; पहिली माळ उत्साहात

दापोली (सागर गोवळे) : तालुक्याचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत आराध्य दैवत असलेल्या बोरिवली-आडिवाडीच्या श्री साई सातमाई नव्हाणकरीन देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा श्रीगणेशा अत्यंत जल्लोषात आणि चैतन्यमय वातावरणात झाला आहे! ग्रामस्थांच्या अफाट उपस्थितीत आणि पारंपरिक विधींच्या गजरात घटस्थापना करत देवीची पहिली माळ अत्यंत भक्तिभावाने चढवण्यात आली आहे. ​उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची पावले वळली होती. शास्त्रोक्त पूजाअर्चा आणि पारंपरिक विधींनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या निनादात आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात एक वेगळाच आध्यात्मिक जोश भरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आडिवाडी ग्रामस्थांची निस्सीम श्रद्धा असलेल्या साई सातमाई देवीच्या दरबारात दापोली पंचक्रोशीतून हजारो भाविक माथा टेकण्यासाठी दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून, भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. "आई साई सातमाई देवीच्या कृपेने संपूर्ण दापोली तालुक्यात आणि गावात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच समस्त ग्रामस्थांच्या वतीने देवीच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्यात आली आहे."

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg