loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्रकिनारी फिरत असताना अचानक आठ जण खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. 42 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असे 44 जण सहलीसाठी आले होते. हे विद्यार्थी आळंदीतील विनर अकॅडमीतील असल्याची माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडालेल्या आठही जणांना समुद्रातून बाहेर काढून उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg