loader
Breaking News
Breaking News
Foto

साडवलीच्या कन्येचा जागतिक स्तरावर गौरव, फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर डॉ. नेहा देवकर झळकल्या

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावच्या शीरपेचात मानाचा तुरा लावणारी व अभिमानाने मान उंचावणारी आणि संपूर्ण परिसरासाठी आनंदाची बाब ठरणारी उल्लेखनीय कामगिरी डॉक्टर नेहा देवकर यांनी केली आहे. देवरुख आणि साडवली या दोन्ही गावांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी डॉक्टर नेहा देवकर यांनी केली आहे. साडवली गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रल्हाद नारायण देवकर यांच्या सुकन्या डॉक्टर नेहा प्रल्हाद देवकर त्वचा रोग तज्ञ (एम.डी.) यांना जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या महिला मासिकापैकी एक असलेल्या फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैद्यकीय क्षेत्रात आपल्या ज्ञान कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील अत्यंत विश्वासार्ह त्वचारोग तज्ञांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ देवकर कुटुंबीय नव्हे तर साडवली गावाचा संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचा गौरव वाढला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

टाईम्स स्पेशल

डॉ. नेहा देवकर यांच्या या यशामुळे गावातील तरुणाईला आणि विशेषतः मुलींना प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल यांच्यावर साडवली ग्रामस्थांसह संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी आणि उत्तरोत्तर यशासाठी सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. डॉ. नेहा देवकर यांच्या यशाचा हा गौरव साडवली गावचा शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg