loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनगाव-घागवाडीत व्यायामशाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

चिपळूण (ओंकार रेळेकर) - गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना नेते भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नांतून सोनगाव-घागवाडी येथील व्यायामशाळेच्या नवीन इमारतीसाठी व्यायामशाळा विकास अनुदान २०२५-२०२६ अंतर्गत १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात संपन्न झाला.ग्रामीण भागातील युवकांना व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळावे आणि खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा मिळावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भूमिपूजन सोहळ्याला चिपळूण तालुकाप्रमुख सुभाष जाधव, लोटे पंचायत समिती सदस्य अजय चाळके, धामणदेवी पंचायत समिती सदस्या रेवती राजेंद्र घाग, खेडचे माजी तालुका सचिव संदीप (बावा) कदम, उपतालुकाप्रमुख विजय साळुंखे, विभागप्रमुख राजेंद्र घाग, उपविभागप्रमुख नंदकुमार कांबळे, ग्रामपंचायत प्रशासक, माजी सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलिंद घोरपडे, नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन पवार,खेड बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राक्षे, ग्रामपंचायत सदस्य भावेश घाग, शेखर मोरे, निषा खेराडे, शाखाप्रमुख संजय खेराडे, दीपक घाग, ग्रामसेवक प्रणिता आग्रे, नामदेव घाग, बाबूराव घाग, महादेव घाग, मारुती घाग, शरद घाग, विलास नलावडे, अनंत घाग, दिलीप दिवेकर, रवींद्र दिवेकर, रवींद्र खेराडे, प्रकाश खेराडे, रामदास खेराडे, संजय कदम, सूरज उत्तेकर, प्रशांत साळुंखे, महेंद्र गमरे, विलास मोहिते यांच्यासह महिला, नवयुग मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या व्यायामशाळेच्या नवीन इमारतीमुळे परिसरातील युवकांना व्यायाम व क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg