loader
Breaking News
Breaking News
Foto

विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी येथे दुर्गा देवीच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी दुर्गादेवीचा नवरात्र उत्सव दिनांक 11 ऑक्टोंबर 2026 ते 22 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत विजयादशमी पर्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. आबलोली बाजारपेठेतील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरा समोरील पटांगणात यावर्षीही घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आबलोली गावात भक्तीमय वातावरण झाले असून नऊ - दहा दिवस दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव विविध, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुर्गा देवीच्या नवरात्रौ उत्सवात देवीची आरती, भजनाचे कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा, दांडिया रास, आरोग्य शिबीरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, अहिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि हळदी कुंकू कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, महाप्रसाद अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी दुर्गादेवीची भव्य दिव्य अशी आकर्षक मूर्ती आबलोली गावचे सुपुत्र आणि पी.एस.आय. सुशील बबन काजरोळकर यांनी भेट म्हणून दिली आहे.

टाईम्स स्पेशल

विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नेटके, उपाध्यक्ष स्वप्निल रेपाळ, सचिव प्रथमेश निमूणकर, खजिनदार ऋषिकेश बाईत, ज्येष्ठ सभासद आणि कार्यकर्ते कृष्णकांत रेपाळ, रवींद्र रेपाळ, अजित रेपाळ, वैभव नेटके, गणेश महाडिक, नरेश निमूणकर, शरद उकार्डे, अतिश रेपाळ, विशाल नेटके, शैलेश दिंडे, प्रसाद नेटके, विशाल लोकरे, शरद लांडे, योगेश रेपाळ, सागर रेपाळ, सत्यम गुरसळे, नितेश निमूणकर, ऋषील निमूणकर, सुरज रेडेकर, राजेश तोडकरी, धनराज गुरसळे, अक्षय निमूणकर, नकुल भंडारी आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते दुर्गा देवीचा नवरात्रौ उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. दहा दिवस होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेपाळ यांच्या मधुर वाणीने होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg