खेर्डी चिपळूण (संतोष पिलके) : केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारे न बनता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडले पाहिजेत, असा मोलाचा संदेश जपानमधील मुसाशिनो विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यासुहिरो हयाशी यांनी दिला. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शालेय जीवनात प्रभावी व सुरक्षित वापर कसा करावा, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात एआयचा वापर करताना माहितीची सत्यता पडताळणे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे आणि तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या विचारशक्तीचा विकास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रा. हयाशी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जपानी आणि भारतीय शिक्षणपद्धतीतील वैशिष्ट्यांची माहिती देत भविष्यातील शैक्षणिक व करिअरच्या संधींवर प्रकाश टाकला. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व करिअरसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. तत्पूर्वी, विद्यालयातील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाने उभारलेले हे आधुनिक शैक्षणिक व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
जपानमधील केईओ विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. संपादन केलेले डॉ. हयाशी सध्या मुसाशिनो विद्यापीठाच्या डेटा सायन्स विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय एशिया एआय इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक आणि केईओ विद्यापीठाच्या एसएफसी येथे वरिष्ठ संशोधन अधिछात्र म्हणून ते काम पाहत असून शैक्षणिक तंत्रज्ञान, डेटाबेस प्रणाली, डेटा मायनिंग, अध्ययन सहाय्यक प्रणाली व सिमॅंटिक कम्प्युटिंग हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान तज्ज्ञाशी थेट संवाद साधता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी नवी जिज्ञासा निर्माण झाली असून विद्यालयासाठी ही भेट अविस्मरणीय ठरली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.