loader
Breaking News
Breaking News
Foto

योगायोग मित्रमंडळ, हातखंबा'तर्फे दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी हातखंबा चौबुर्जीवाडी नदीवर बांधला ६० फूट रुंदीचा कृषी बंधारा

​रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्याच्या गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखत, 'योगायोग मित्रमंडळ, हातखंबा' च्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्तुत्य जलसंधारण उपक्रम हाती घेण्यात आला. 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या मोहिमे अंतर्गत मंडळाच्या माध्यमातून हातखंबा येथील चौबुर्जीवाडी नदीवर तब्बल ६० फूट रुंदीचा कृषी बंधारा श्रमदानातून व सहकार्याने बांधण्यात आला आहे.​पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन व्हावे आणि परिसरातील भूजल पातळी वाढून शेतीला व ग्रामस्थांना जलसंकटातून दिलासा मिळावा, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महत्त्वपूर्ण सामाजिक व श्रमदानायच्या उपक्रमात 'योगायोग मित्रमंडळा'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री, महेश खानविलकर, ओमकार कोळवणकर, विजय शिंदे, संदीप गुरव, केदार गुरव, अभिजीत गुरव, निलेश देसाई, प्रदीप विचारे, शशिकांत देसाई, बाळू देसाई यांच्यासह चौबुर्जीवाडी येथील माता-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित राहून या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. ​ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि संकटाच्या काळात कायम अग्रेसर राहणाऱ्या 'योगायोग मित्रमंडळा'च्या या उल्लेखनीय जलसंधारण कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg