loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक हिरव्या गवतापासून सायलेज निर्मितीचे प्रात्यक्षिक; चारा व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वणौशी (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘कृषिस्नेही’ गटातर्फे स्थानिक हिरव्या गवतापासून सायलेज निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या हिरव्या गवताचे योग्य पद्धतीने संवर्धन करून चारा टंचाईच्या काळात जनावरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रात्यक्षिकादरम्यान सर्वप्रथम ताजे व निरोगी हिरवे गवत गोळा करून चाफ कटरच्या साहाय्याने त्याचे लहान तुकडे करण्यात आले. त्यानंतर १०० किलो हिरव्या गवतासाठी १.५ किलो गूळ आणि ५०० ग्रॅम युरिया वापरण्याचे प्रमाण समजावून सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिश्रण तयार करण्याची पद्धत, गवतामध्ये ते समान प्रमाणात मिसळणे, प्लास्टिक पिशवी किंवा कंटेनरमध्ये गवताचे थर भरणे, प्रत्येक थर व्यवस्थित दाबून हवा काढणे आणि कंटेनर हवाबंद करणे या प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखविण्यात आल्या. सायलेज तयार करताना स्वच्छता राखणे, योग्य पद्धतीने गवत दाबणे आणि हवाबंद साठवणूक करणे यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तसेच किण्वन प्रक्रियेनंतर तयार सायलेजचा रंग, वास आणि पोत तपासून त्याची गुणवत्ता ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बुरशी लागलेले किंवा खराब झालेले सायलेज जनावरांना देऊ नये, याबाबतही माहिती देण्यात आली. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असलेल्या काळात सायलेजचा वापर करून पशुधनासाठी चारा साठवून ठेवता येतो. त्यामुळे अतिरिक्त हिरव्या गवताचा योग्य उपयोग करून चारा व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येते, हे या प्रात्यक्षिकातून स्पष्ट करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ आणि श्रावणी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेष तज्ज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg