loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा दुसरा दिवस उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचे सामने व विविध क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धांचे उद्घाटन शेठ म. ग. हायस्कूल, देवगडचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, तालुका क्रीडा समन्वयक आकाश पारकर आणि माजी तालुका समन्वयक उत्तरेश्वर लाड ज्येष्ठ शिक्षक फणसेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती आणि संघभावना विकसित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी देवगड तालुका क्रीडा समन्वयक आकाश पारकर, क्रीडा शिक्षक सुरेश पवार, ज्ञानेश्वर कुंभरे, अरविंद धुर्वे, अजित कदम, रुपेश बांदेकर तसेच देवगड तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ढेरे यांनी केले. सर्वांच्या सहकार्यामुळे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg