खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे, नळपाणी योजनेसाठी खोदून तसेच ठेवलेले रस्ते आणि वाढत्या भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दि. २८/०९/२०२६ रोजी दिलेल्या या निवेदनावर तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव, युवा तालुकाध्यक्ष सचिन खेडेकर आणि शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी खेड आणि पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, दापोली-खेड मार्गावरील टेलिफोन ऑफिससमोरील रस्त्यावर अत्यंत धोकादायक स्वरूपाचे खड्डे निर्माण झाले आहेत. या परिसरात सुमारे पाच वर्षांपूर्वी एका मुलाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते. पुन्हा एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन खड्डे बुजवणार आहे का? असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
तसेच एस.टी. स्टँडपासून गांधी चौकाकडे जाताना वाणी बीड परिसरातील उताराची अवस्था अत्यंत खराब असून दुचाकीस्वार आणि पादचार्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पाईपलाईन व नळपाणी योजनेसाठी खोदलेले रस्ते कामानंतर व्यवस्थित बुजवले जात नसल्याने ठिकठिकाणी माती, दगड आणि उंच-सखल भाग तयार झाला आहे. आरसीसी रस्त्यांच्या जोडरस्त्यांवरही मोठे खड्डे पडले आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना त्याचा मोठा त्रास होत आहे. येत्या दसरा-नवरात्रोत्सवात रात्री ११-१२ वाजेपर्यंत मुले, तरुण-तरुणी गरब्यासाठी बाहेर पडणार आहेत. अशावेळी कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्यास जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच मोकाट जनावरे रस्त्यावर अचानक येत असल्याने अपघात होत आहेत. अलीकडेच मोकाट जनावरामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
संघटनेच्या १० प्रमुख मागण्या : १. टेलिफोन ऑफिससमोरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत. २. शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक खड्ड्यांची यादी करावी. ३. पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावेत. ४. वाणी पेठ उतार आणि इतर धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करावी. ५. आरसीसी रस्त्यांच्या बाजूचे जोडरस्ते दुरुस्त करावेत. ६. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नियमानुसार उपाययोजना करावी. ७. मोकाट जनावरे पकडण्यासाठी प्रभावी पथक नेमावे. ८. नवरात्रोत्सव काळात रात्रीच्या वेळी विशेष सुरक्षा उपाययोजना करावी. ९. या सर्व कामांसाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा. १०. केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती नागरिकांना द्यावी. नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी आजच जागे व्हावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.