loader
Breaking News
Breaking News
Foto

भडकंबा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा दुधाणे यांचे दु:खद निधन

साखरपा (वार्ताहर) - संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, निष्ठावान शिवसैनिक सीताराम उर्फ दादा दुधाणे यांचे ३० ऑक्टोबर रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भडकंबा गाव आणि संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कै.दादा दुधाणे यांना जन्मापासूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभला. गावाच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. कै. दादा हे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत होते. महाराष्टृ शासनाने भडकंबा ग्रामपंचायतीचेे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कै. दादा दुधाणेे यांची निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक तसेच वैयक्तिक तंटे प्रभावीपणे सोडविण्यात आले. शिमगा असो वा कोणताही धार्मीक कार्यक्रम असो..गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

साखरपा पंचक्रोशीत शिवसेना पक्षाचा पहिला शाखाप्रमुख म्हणुन त्यांनी धडाडीने काम केले. शिवसेनेचे संगमेश्वरचे पहिले आमदार तथा माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आजही रविंद्र माने भडकंबा येथे आले तर दादांची भेट घेतल्याशिवाय जायचे नाहीत. माजी आमदार सुभाष बने यांचेही कै. दादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. श्रीदेव केदारलिंग देवस्थान ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने नि:स्वार्थपणे समाजसेवा करणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. भडकंबा ग्रामस्थांमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg