loader
Breaking News
Breaking News
Foto

हंगामाआधीच कोकणच्या राजाची एंट्री! धोकवडे गावातून आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात

अलिबाग, (वार्ताहर) - फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा "आंबा" हे अनेकांचे आवडते फळ आहे. कितीही महाग मिळाले तरीही ग्राहक त्याचा विचार करीत नाहीत. या वर्षी आंब्याचा हंगाम सूर व्हायचा आहे; त्या आधीच अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातून आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात रवाना झाली. धोकवडे गावातील जनार्दन म्हात्रे हे गेली 25 वर्ष आंबा खरेदी..विक्री व्यवसायात आहेत. करारावर आंब्याच्या बागा घेऊन ते हा व्यवसाय करीत आहेत. योग्य ती मेहनत, घेऊन त्यांनी गेली 25 वर्षे या व्यवसायात आपले नाव केले आहे. या वर्षी त्यांच्या बागेतील हा हापूस आंबा हंगाम सुरू होण्याआधी बाजारात पाठविण्यासाठी तयार झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वर्षी पावसाने दगा दिल्याने एकीकडे भातशेती पिकविणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास काही ठिकाणी परतीच्या पावसाने हिरावून घेतला. शेतात भात नाही, विहिरीत पाणी नाही, अशी बिकट अवस्था या वर्षी झाली आहे. त्यात पर्यायी उत्पन्न म्हणून आंबा बागायतीकडे पाहिले जाते. आंबा पिकाला पोषक अशी थंडी अजून सुरू झाली नाही. परंतु जनार्दन म्हात्रे यांच्या आंबा बागेतील आंबा मोहरुन त्याला फळ लागले, आणि ते फळ तयार होऊन 9 नोव्हेंबर रोजी वाशी बाजपेठेत रवाना झाले. ऐन दिवाळीत जनार्दन म्हात्रे यांच्या बागेतील आंबा तयार झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg