loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका स्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर नं.१ शाळेचे यश

खेड - सेवा संकल्प अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धांतर्गत खेड तालूकास्तरीय वत्कृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या गटात शुभ्रा भगवान जंगम हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम व निबंध स्पर्धेत तृतीय तर वक्तृत्व व निबंध स्पर्धेत लहान गटात शौर्य मंगेश मर्चंडे याने प्रथम क्रमांक मिळवला. प्रत्येक प्रभागातून आलेल्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही तालुकास्तरीय स्पर्धा झाली. शुभ्रा भगवान जंगम व शौर्य मंगेश मर्चंडे यांनी ओघवत्या शैलीत, व आशय व विषयाची व्यवस्थित मांडणी करून आपल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ व मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. खेड नं.१ शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, केंद्रप्रमुख राहुल जाधव, दिप्ती यादव, रविंद्र देवळेकर, तृप्ती म्हात्रे यांनी काम पाहिले. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गायत्री माने खोपी, विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड, पतपेढीचे माजी संचालक संतोष उतेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg