मुंबई (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागारपदी मंत्रालयातील महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहसचिव माधव नारायण काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी ही घोषणा केली. प्रशासकीय, कायदेविषयक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या माधव काळे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस तथा बडोदा येथील उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजीत दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार व उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सूचनेनुसार राज्य सचिव तथा निवृत्त पोलीस अधिकारी आनंदराव जाधव यांनी ही नियुक्ती जाहीर केली. माधव नारायण काळे (वय ६५) हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांनी बी.एस्सी., एलएल.बी., डी.आय.टी., डी.सी.एल. आणि एम.ए. (मराठी) अशा विविध शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
त्यांनी १९८४ ते २०१९ या प्रदीर्घ कालावधीत मंत्रालयात महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांवर काम केले. मे २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव पदावरून ते सेवानिवृत्त झाले. १९९८ ते २००८ या काळात त्यांनी माझगाव न्यायालयात विशेष महानगर दंडाधिकारी म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात जानेवारी २०१७ ते मे २०१९ आणि जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत त्यांनी महाव्यवस्थापक (कर्मचारी व औद्योगिक संबंध) म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाज, कामगारांचे विविध प्रश्न आणि चार संप हाताळण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव त्यांना मिळाला. याशिवाय महामंडळाच्या महाव्यवस्थापक (नियोजन व प्रशासन) पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच काळे यांना साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचीही विशेष आवड आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळात त्यांनी संपादन प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी दोन मराठी एकांकिका लिहिल्या असून त्यापैकी एका एकांकिकेचे मुंबई विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवात सादरीकरण झाले होते. वाचन, प्रवास, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत ऐकणे आणि कविता करणे हे त्यांचे छंद आहेत.
यावेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले म्हणाले की, माधव काळे हे वकील, माजी न्यायिक अधिकारी, साहित्यिक आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत. एसटी महामंडळातील महत्त्वपूर्ण जबाबदारीसह विविध क्षेत्रांतील त्यांचा अनुभव समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे. एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या मार्गदर्शनाचा संघटनेला मोठा फायदा होईल. मराठा क्रांती स्वराज्य संघटनेत सहभागी होण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी इच्छुक असून, लवकरच अधिकाधिक समाजबांधवांना संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेच्या प्रवाहात जोडण्यात येणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली. दरम्यान, माधव काळे हे निवृत्तीनंतरही सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या वेळी बोलताना सदानंदराव भोसले यांनी सांगितले माधवराव काळे हे माजी न्यायमुर्ती, साहित्यिक, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी, म्हणून देखील कार्यरत होते. समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.