loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे घवघवीत यश

खेड - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने दिनांक 10 व 11 ऑक्टोबर दरम्यान खेड क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या 14, 17 व 19 वर्षांखालील मुलांच्या तिन्ही संघांनी व 17 वर्षांखालील मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघात सारा धामणकर, शरण्या साळुंखे, आरोही जाधव आणि श्रेयसी गायकवाड या विद्यार्थिनींचा समावेश आहे. वरील सर्व खेळाडूंना डॉ. गौरव आंब्रे यांचे मार्गदर्शन लाभले असून या खेळाडूंची दि. 13 व 14 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेच चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg