loader
Breaking News
Breaking News
Foto

अंगारकी चतुर्थीनिमित्त आंजर्ले कड्यावरील गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी

दापोली (प्रतिनिधी) : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंजर्ले कड्यावरील गणपती मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे मिनी महाबळेश्वर अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अशा या दापोलीतील आंजर्ले येथील कडयावरील श्री.गणपती देवस्थान हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. या कडयावरील श्री गणपती देवस्थानामुळे आंजर्ले गावात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. आंजर्लेत पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे हमखास करून आंजर्लेतील सुप्रसिद्ध कडयावरील गणपती मंदिरात देवदर्शनासाठी जातातच जातात. त्यामुळे येथे देव दर्शनासाठी येणा-या पर्यटकांसोबतच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या देवस्थानचे स्थान महात्म्य अधिक वाढले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंजर्ले येथील कडयावरील श्री गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच आहे. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर येथे लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवायच्या आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत.हे मंदीर टेकडीवर असल्याकारणाने आपण दर्शनासाठी टेकडीवर येताच ते आपल्या दृष्टीस पडते. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरील श्री गणपती देवस्थान हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

टाईम्स स्पेशल

अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्त गण हे देव दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठीची येथे मोठी गर्दी होत असते. तसे आज मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंगारकी चतुर्थी असल्याने भाविक भक्त गणांनी दर्शनासाठी मोठीच गर्दी केली होती. कड्यावरील श्री गणपती देवस्थान व्यवस्थापन आंजर्ले यांनी येथे देव दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्तगण भाविकां देव दर्शनासाठीची उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक भक्त गणांना अगदी मनोभावे दर्शन घेता आले. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे खरे यश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg