loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळेसह आरे वारे परिसरात समुद्रकिनाऱ्यावर विक्रमी गर्दी, पाच लाख पेक्षा अधिक पर्यटक कोकणात!

रत्नागिरी टाइम्स डिजिटल डेस्क: गणपतीपुळे सह रत्नागिरी आणि रायगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक आले असून कोकणातील सर्व समुद्रकिनारे आज पर्यटकांनी गजबजून गेले. आरे वारे ,गणपतीपुळे, मालगुंड या किनाऱ्यावर शेकडो वाहने आज पार्किंग केलेली दिसली तसेच समुद्र किनारपट्टीवर शेकडो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना दिसून आले. दीपावली सणानिमित्त पर्यटनासाठी जिल्ह्यातून व घाटमाथ्यावरून कोकणात आलेल्या पर्यटकांनी गेले दोन दिवस मोठी गर्दी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले काही महिने समुद्र किनारपट्टीवरील ठप्प असलेल्या हॉटेल लॉजिंग व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून पर्यटकांची निवास व्यवस्था अपुरी पडत असल्याचेही दिसून येत आहे. निवास व्यवस्था अपुरी असल्याने काही पर्यटकांनी सुरूच्या बनातच मुक्काम ठोकल्याचे दिसून येते. दीपावली सणानिमित्त सहकुटुंब आलेल्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.

टाइम्स स्पेशल

गेल्या दोन दिवसांपासूनच कोकणात हिवाळ्याची थंडी सुरू झाली आहे. रात्री बारा वाजल्यापासून मतलई वाऱ्यांचा झंजावात सुरू असल्याने ग्रामीण भागात विशेषता अल्हाददायक वातावरण दिसून येत आहे, सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये थंडीने चांगलीच हुडहुडी भरत असल्याचेही लोक सांगत आहेत. कोकणात आलेल्या पर्यटकांनी सध्या निसर्गात झालेला आनंदी बदल अनुभवला आहे, काही स्थानिक लोक असे सांगतात की किमान पाच लाख पेक्षा अधिक लोक पर्यटनासाठी कोकणात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg