loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत बागेश्री भजन मंडळाच्या महिला मंडळात कौटुंबिक वातावरणात सोहळा

रत्नागिरी : लेखिका सविता शांताराम कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी छत्रपती नगर येथील बागेश्री भजन मंडळाच्या महिला मंडळात कौटुंबिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. मैत्रिणींनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या सोहळ्यात साहित्यप्रेमींनी लेखिकेचे अभिनंदन केले. सरस्वती मातेला शब्दसुरांतून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रवचनकार अंजली बर्वे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. ज्येष्ठ मैत्रिणी वैशंपायन, घारपुरे आणि घैसास यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सविता कोकजे यांचा शाल, श्रीफळ, अभिनंदनपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अभिनंदनपत्राचे लेखन व वाचन अंजली बर्वे यांनी केले. राधिका कुलकर्णी आणि साधना वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त करत लेखिकेला शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सविता कोकजे म्हणाल्या, “माझे हे साहित्यिक अपत्य आहे आणि ते मला प्रिय आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम साजरा केलात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज माझ्याजवळ शब्द नाहीत. मी भारावून गेले आहे.”

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाची प्रस्तावना, लेखिका परिचय, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी वंदना घैसास यांनी समर्थपणे सांभाळली. यावेळी मंडळातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाच्या आजी-माजी सदस्यांची उपस्थिती होती. कथा, लेख, व्यक्तिचित्रणे आणि कविता अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश असलेला ‘गुलदस्ता’ हा संग्रह स्पर्श प्रकाशन, राजापूर यांनी प्रकाशित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg