loader
Breaking News
Breaking News
Foto

बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

रत्नागिरी (जमीर खलफे) : 'प्रत्येक वर्षी दिवाळी अंकातील विविध प्रकारचे वाचन साहित्य आपल्याला दिवाळी सणासारखेच आनंदी करते. दरवर्षी आपण सर्वजण या अंकांची वाट बघत असतो; ज्यामुळे आपला सणाचा आनंद अधिक द्विगुणित होतो. सर्वांनी उपलब्ध दिवाळी अंकांचा सदुपयोग करावा, असे आवाहन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयाच्या (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. डी. आर. वालावलकर, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे, प्रा. दत्तात्रय पोटे, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. वासुदेव आठल्ये, प्रा. अरुण यादव, ग्रंथपाल किरण धांडोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

प्रास्ताविक सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. किरण धांडोरे यांनी आभार मानले. प्रदर्शनामध्ये विविध विषयांना वाहिलेले अनेक दिवाळी अंक मांडण्यात आले. या प्रदर्शनाला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनासाठी आकर्षक अशी आरास केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg