loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण रुग्णालय पाली येथे राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह उत्साहात साजरा

रत्नागिरी (जमीर खलफे) : ग्रामीण रुग्णालय पाली येथे राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नवजात शिशूंची काळजी, स्तनपानाचे महत्त्व, बाळाचे वजन, उब, स्वच्छता आणि वेळेवर लसीकरण या विषयांवर उपस्थित माता व रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या वेळी डॉ. माने यांनी नवजात शिशूंच्या आरोग्याबाबत माहिती दिली. जन्मानंतरचे सुरुवातीचे दिवस बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, बाळाला वेळेवर स्तनपान देणे, उबदारपणा राखणे आणि संसर्गापासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी सिस्टर गिम्हवनेकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवजात बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे आणि प्रत्येक बाळाला निरोगी आयुष्य लाभावे, या उद्देशाने अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे ठरते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मातांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg