loader
Breaking News
Breaking News
Foto

धमाका चषकावर साई इलेव्हन लांजाची दिमाखदार मोहर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - चिपळूण येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या एस.पी.धमाका चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेवर साई इलेव्हन लांजा संघाने दिमाखात आपली मोहर उमटवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बलाढ्य मुरुड-अलिबाग संघाचा पराभव करत साई इलेव्हनने धमाका चषकावर कब्जा केला. विजेत्या संघाला रोख ६१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विजयामुळे केवळ साई इलेव्हन लांजा संघाचाच नव्हे, तर लांजा शहराच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात साई इलेव्हन लांजा संघाने सावर्डा संघावर सहज मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात राहुल झोरे आणि अजय चव्हाण यांनी नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शानदार फलंदाजीमुळे साई इलेव्हनचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला. अंतिम सामन्यात साई इलेव्हनसमोर मुरुड-अलिबागचा बलाढ्य संघ होता. मात्र लांजाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली. सागर कांबळे आणि इम्रान मुकादम यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मुरुड-अलिबागच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांनी निर्माण केलेल्या दबावाचा फायदा घेत साई इलेव्हनच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात बाजी मारत धमाका चषक लांजाच्या नावावर केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg