loader
Breaking News
Breaking News
Foto

पडवे सखी प्रभाग संघाच्या कृषी अवजारे बँकेचे जि. प. कृषी सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन

साखरपा (दीपक कांबळे) - तिवरे तर्फे देवळे ग्रामपंचायत आणि संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटना सहकार्यातून तीवरे तर्फे देवळे येथील काजळी नदीवर बंधारा बांधण्याचे सुंदर नियोजन करण्यात आले. दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सदर बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण शेठ जाधव, ज्येष्ठ सल्लागार दादा सुर्वे, खजिनदार पप्पू गांधी, अनंत बांडागळे, संजय बावदाने, गौरव पांगळे, घडशी, संघटनेचे सहसचिव आणि तीवरे ग्रामपंचायतचे उपसरपंच ओंकार सुर्वे तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कांबळे, सदस्य किशोर सुर्वे, श्रीपत रामाने, माजी सरपंच गणपत सुर्वे, उद्योजक नाना सुर्वे, ग्रामसेवक विशाल कांबळे, पोलीस पाटील संतोष कांबळे, ग्रामस्थ काशीराम कांबळे, प्रकाश सुर्वे, महेश सुर्वे, पाणी कर्मचारी अनिकेत ढवळ, प्रथमेश सुर्वे, विनेश सुर्वे, जयवंत पाटील, शैलेश सुर्वे, संदेश सुर्वे, रोहित सुर्वे आदी बहुतांशी ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण गावासाठी असलेल्या नळपाणी योजनेच्या नदीपात्रातील जॅकवेलला पाण्याचा साठा कायम राहावा, यासाठी दरवर्षी या ठिकाणी ग्रामस्थांच्या मेहनतीने कच्चा बंधाऱ्याचे बांधकाम केले जाते. मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या बाजूला गाळ जमा झाल्याने जेसीबीच्या साह्याने गाळ काढावा लागत आहे. ग्रामस्थांच्या आणि लाकूड व्यापारी संघटनेच्या श्रमदानातून हा बंधारा उभा राहत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने ठीक-ठिकाणी अशा प्रकारचे बंधारे उभे राहिल्यास पाण्याची तितकी टंचाई भासणार नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg