मंडणगड (प्रतिनिधी) : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देव्हारे पंचक्रोशी हायस्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी अर्णव चोरगे याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मंडणगड येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने लांब उडी आणि १०० मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारांत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या दुहेरी यशामुळे शाळेसह देव्हारे परिसराचा गौरव वाढला आहे. अर्णवच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल येथे त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा गौरव करण्यात आला.
यावेळी अर्णवचे अभिनंदन करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, अर्णवने मिळवलेले यश हे त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि आत्मविश्वासाची पावती आहे. या यशामागे त्याचे वडील सचिन चोरगे यांचे परिश्रम, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन यांचाही मोलाचा वाटा आहे. अर्णवच्या कामगिरीमुळे त्याच्या कुटुंबीयांसह शाळा आणि संपूर्ण देव्हारे परिसराची मान उंचावली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता असून, त्यांना योग्य मार्गदर्शन, सरावासाठी आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. अर्णवसारख्या गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही देवळेकर यांनी नमूद केले. या सत्कारप्रसंगी प्रभारी प्राचार्य विष्णू बडे, प्राध्यापक कुंडलिक यादव, अमित रसाळ, प्रशांत उगले यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.